बालाजी विद्यालयात दिवाळी शिबिरानिमित्त व्याख्यानमाला

लोक वार्ता न्युज शिरूर:
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या मार्गातून प्रयत्न केले जातात.
दि. 30 ऑक्टोबर रोजी दिवाळी शिबिर विद्यालयात आयोजित केले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरियन श्री. शितल शहा, पुणे यांचे “यशाची गुरुकिल्ली” या विषयावर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतल्या गेल्या . ,वक्तृत्व स्पर्धा ,निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा,कविता पाठांतर, पाढे पाठांतर, कथाकथन स्पर्धा, प्रश्न मंजुषा, मैदानी खो खो, कबड्डी, ॲथलेटिक्स आणि बैठे खेळ अशा विविध ऍक्टिव्हिटी घेतल्या . दि.1नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी डॉक्टर अनिता मोहिते ,श्रीमती नीता जाधव ,कल्पना हाबडे,सुप्रिया बेंडखळे , रोटरियन नीता पाटील दत्तात्रय कापरे , वसंत गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते
विद्यालयाचे मुख्याध्यापकांच्या हस्ते मान्यवरांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आणि प्रशस्ती पत्रक देण्यात आले. त्यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थ्यांची लक्षणे व जबाबदाऱ्या, देशभक्ती यशाची गुरुकिल्ली, तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील मूल्य व कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले .
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव आण्णा पवार यांनी देखील शिबिराच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या धाडसी वृत्तीचे व त्यांच्या कला गुणांचे कौतुक केले.
आपल्या प्रभावी शैलीत श्री.शितल शहा यांनी देखील विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या मेहनत, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी व्याख्यानाचा आनंद घेतला.
सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना दिशा मिळाली व आपले काय कर्तव्य आहे हे देखील कळाले. विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री वाव्हळ यांनी केले. तर आभार स्वाती चत्तर यांनी मानले. व कार्यक्रम यशस्वी पार पाडला.



