
लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर येथील विद्याधाम प्रशालेतून २००४ साली दहावीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शालेय स्नेहमेळावा नुकता उत्साही वातावरणात नुकताच पार पडला.
सुमारे दोन दशकांनंतर, शाळेच्या परिसरात पुन्हा पाऊल ठेवताना सर्वांच्या डोळ्यांत जुन्या आठवणींनी आनंदाश्रू आणले आणि हृदय भरून आले. हा कार्यक्रम म्हणजे एका सुंदर पर्वाचा स्मरणोत्सव होता, ज्यात विद्यार्थी, शिक्षक, आणि शाळेतील इतर कर्मचारी पुन्हा एकत्र आले.या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या वर्गातील सर्व माजी विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे पाचवी ते दहावीचे सर्व अध्यापक उपस्थित होते. यामध्ये पोटे सर, कुलकर्णी सर, बालटे सर, मुळे सर, जैन सर, तांबोळी सर, खेमनर सर, बनकर सर ,जाधव सर, देंडगे सर, पटेल मैडम, वाठोडकर मैडम, आवटी मैडम, श्रीमती रणदीवे मैडम व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गप्पा-गोष्टी, जुन्या आठवणी, यशोगाथा व छायाचित्रांमुळे वातावरण भरून आलं होतं. विविध क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रमांची दिशा ठरवण्याचा मनोदय व्यक्त केला.. जुन्या आठवणींचे समृद्ध आदानप्रदान झाले. हा मेळावा केवळ आठवणींमध्ये रमण्यापुरता मर्यादित न राहता, जुनी नाती घट्ट करण्याचा आणि भविष्यात एकत्र काही करण्याचा सकारात्मक प्रयत्न ठरला. सोशल मीडियाच्या मदतीने दूरवर असलेल्या सहपाठींनाही एकत्र आणण्यात यश मिळाले.
या मेळाव्याचे आयोजन कोअर कमिटीने अत्यंत परिश्रमाने आणि नेटकेपणाने केले होते. शाळेतील काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन नियोजन, संपर्क, निमंत्रणे, आणि संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. कोअर कमिटी सदस्य – मयूर गादिया, कुमार वर्मा, प्रतीक बिसावा, उदय सुकले आणि अभिजीत थोरात यासोबत, आयोजनामध्ये हेमंत काले, यशोदीप थोरात, सोनाली लोखंडे, परीक्षित गायकवाड़ ,पीयूष हटकर, सागर बांदल, यानी सहकार्य केले. सर्व मित्रांनी त्यांच्या वेळेची, मेहनतीची आणि योग्य समन्वयाची मदत केली व सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री प्रल्हाद वाघमारे, परीक्षित गायकवाड़ यांनी केले. अभिजीत थोरात यानी आभार मांडले. तसेच या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व इथून पुढेही अशाच प्रकारची सामाजिक बांधिलकी जपण्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यात अनेक सहकार्य करणाऱ्या सदस्यांचाही मोठा सहभाग होता.



