राजकीय

कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची असुन कोणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

लोक वार्ता न्युज शिरूर :

शिरूर परिसरात वाढत्या औद्योगिकरणाबरोबर कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची असुन कोणीही इथे कायदा हातात घेण्याच्या प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, येथे कोणाची ही दहशत खपवुन घेतली जाणार नाही. असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याचे सांगितले.

.यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, संचालक सुधीर फराटे, राहुल जगताप शशिकांत दसगुडे ,विठ्ठलराव ढेरंगे , श्रीनिवास घाडगे ,दिलीप वाल्हेकर, महेश ढमढेरे, शरद कालेवार ,आरती भुजबळ व आदी उपस्थित होते.

शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा शिरूर शहरातील पाचकंदिल चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते .

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की आम्ही सर्व सामान्यांचा विकासासाठी सरकार काम करत आहे महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत शिरूर शहर झपाट्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे शिरूर शहरालगत कारेगाव ,कर्डे, रांजणगाव,सुपा अशा अद्योगिक वसाहती विस्तारत आहेत शिरूर शहर हे वाढत आहे वाढत्या शहरीकरणाचा वेग लक्षात घेऊन शहराचा विकास नियोजनबद्ध होणे गरजेचे आहे. शिरूर शहराचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी असल्याचे सांगून क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिरूर शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न सर्वांना विश्वासात घेऊन निकाली काढण्यात येईल . शिरूर शहर हे शैक्षणिक केंद्र कसे बनेल त्या दष्टीने काम करू असे म्हणाले.

केंद्रात व राज्यात महायुतीत सत्तेत असून चांगले काम करून घेण्याची क्षमता आमच्यात आहे प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर नगर परिषदेला पक्षावर निवडणूक लढवीत असून शिरूर नगर परिषदेत आम्ही प्रकाश धारीवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडी बरोबर निवडणुकीस सामोरे जायचो यात मी कधीही हस्तक्षेप केला नाही, काहीजण चुकीचे सांगतात की, अजित पवार यांनी जास्त जागा राष्ट्रवादीला मागितल्या प्रकाश धारीवाल यांनी मला स्पष्ट पणे सांगितले की माझ्या उद्योग व्यवसायामुळे मी निवडणुकीत नसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सर्वसमावेशक पॅनल उभे केला सुशिक्षित विकासाची जाण असलेले कार्यक्षम उमेदवार दिले आहेत या पॅनलच्या पाठीशी शिरूरकर जनतेने आपली ताकद उभी करावी असे अजित पवार म्हणाले.

यावेळी विनोद भालेराव निलेश लटांबळे निलेश गाडेकर अविनाश घोगरे विठ्ठल पवार अभिजीत पाचर्णे या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान अजित पवार यांनी केले.

शिरूर शहरासाठी ७१ कोटीची पाणीपुरवठा योजना प्राथमिक शाळा इमारतीसाठी तीन कोटींचा निधी गेल्या अडीच वर्षात शहरासाठी सुमारे ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला विद्यमान खासदाराने शिरूर शहरासाठी आत्तापर्यंत किती निधी दिला आहे मी माझे खासदार असूनही शिरूर साठी निधीला असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

आमदार माऊली कटके म्हणाले की शिरूर शहर हे पुणे जिल्ह्यातील अग्रगणने शहर बनविण्याचा ध्यास असून शासनाने शहरातील भुयारी गटार योजनेसह पाणी पुरवठा योजनेसाठी निधी दिला आहे. शिरूर शहर हद्दवाढीचा ही प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे कटके म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button