शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक तीन डिसेंबरला

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक तीन डिसेंबरला होणार असुन शहराला नवीन कारभारी मिळणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीकरिता गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असणाऱ्या उमेदवारांसाठी गुड न्यूज असून निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे त्यानुसार शिरूर नगरपरिषदेची निवडणूक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार असून निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे निकाला नंतर शहराला नवीन गाव कारभारी मिळणार आहेत.
यासंदर्भात जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकी करता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर अशी आहे.
उमेदवारी अर्जाची छाननी 18 नोव्हेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी आहे. दिनांक दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून निवडणूक निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे.
शिरूर नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण ३२९९३ मतदार असतील.
शिरूर नगरपालिकेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता होती.मागील निवडणुकीच्या वेळेस मध्ये एकूण नगरसेवकांची संख्या 21 होती त्यात आता वाढवून ती 24 झाली आहे तर नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडले जाणार असून ते ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. मागील नगरपालिकेत शिरूर शहर विकास आघाडीचे 17 नगरसेवक होते. भारतीय जनता पक्षाचे व एक अपक्ष व एक लोकशाही क्रांती आघाडी असे पक्षीय बलाबल होते.
विधानसभा निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत पालिकेवर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



