शिरुर शहरात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास : महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
भाजपाचे उमेदवारांना निवडणून देण्याचे आवाहन

लोक वार्ता न्युज शिरूर :
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवून शिरूर शहराचा विकास साधला जाईल असे आश्वासन.महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले
शिरूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिरूर शहरात आले होते. यादरम्यान शिरूर बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते .
यावेळी आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पलांडे, तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे, धर्मेंद्र खांडरे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, प्रिया बिरादार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुवर्णा लोळगे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते
यावेळी महसुल मंत्री बावनकुळे म्हणाले की, शहरातील हुडको कॉलनी संदर्भातील वर्ग दोनची प्रॉपर्टी वर्ग एक करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल व हुडकोतील घरे नावावर करण्याचा विषय काही महिन्यात मार्गी लावण्यात येईल. तसेच शिरूर शहराचा सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड वाटपाची प्रक्रिया करण्यात येईल.
शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील खेळाच्या मैदानाच्या आरक्षण संदर्भातला प्रश्न व गुजर मळ्यातील खेळाच्या मैदानाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली .
या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता शिरुरकरांनी भाजपाकडे दिल्यास शिरूर शहराचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे सांगून भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन महसुल मंत्री बावनकुळे यांनी दिले .



