शैक्षणिक

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी चे यश 

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इनोव्हेटिव्ह फार्मसी मध्ये सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या तृतीय वर्ष बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग

लोक वार्ता न्युज शिरूर :

अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संगमनेर आयोजित दुसरी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इनोव्हेटिव्ह फार्मसी मध्ये सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या तृतीय वर्ष बी. फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत या कॉन्फरन्स मध्ये प्रा. डॉ. मनोज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर प्रेझेंटेशन या विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त करत या महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.

यामध्ये प्रणव बडगुजर, रिया अग्रहारी, सुभश्री साहू, ज्ञानदा जाधव व ओम इथापे यांनी हा मान मिळवला. राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी देश विदेशातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख धनादेश याने गौरवण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे, प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button