राजकीय
प्रभाग क्रमांक ९ मधील अपक्ष उमेदवार मुमताज दगडुभाई पठाण (शेख ) यांना मतदारांचा उस्फुर्त पाठिंबा

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सुरु झाला असुन यामध्ये प्रभाग क्रमांक ९ मधील अपक्ष उमेदवार मुमताज दगडुभाई पठाण (शेख ) यांना मतदारांचा उस्फुर्त पाठिंबा मिळत आहे .

वडिल स्वर्गीय दगडु भाई पठाण व पत्ती सामाजिक कार्यकर्ते गफुर शेख यांच्या त्या पत्नी असुन प्रभागातील सिद्धार्थनगर या भागात स्थानिक रहिवाशी असलेल्या या अपक्ष उमेदवार आहेत .

स्थानिक प्रश्नांची व जनतेच्या विविध समस्यांची सोडवणुक करण्याच्या दृष्टीने त्यांनी व सामाजिक कार्यकर्ते गफुर शेख आजतागायत प्रयत्न केले आहेत . त्यामुळे स्थानिक जनते चा त्यांना पाठींबा मिळत असल्याचे दिसत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे .



