Uncategorized

पत्रकार प्रा. डॉ.दत्तात्रय मारुती कारंडे यांचे निधन

लोक वार्ता न्युज शिरूर :

न्हावरा,ता.शिरूर येथील पत्रकार प्रा. डॉ.दत्तात्रय मारुती कारंडे वय-४५ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, आई ,वडील, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

कारंडे यांनी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय व मल्लिकार्जुन विद्यालय येथे शिक्षक म्हणून काम केले. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत त्यानी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते. ‘भीमथडी परिसरातील धनगरी लोकसाहित्याचा लोकतत्वीय अभ्यास ‘ या विषयावर प्रा.डॉ.बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पदवी साठी त्यांनी प्रबंध लिहिला होता. मागील २० वर्षाहून अधिक काळ न्हावरा ता. शिरूर येथे ते दैनिक लोकमतचे पत्रकार म्हणून काम करीत होते. वृत्तपत्रीय लेखनातून विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व सामाजिक , सांस्कृतिक व राजकीय विषयांवर त्यांनी लेखन केले. न्हावरे येथे मल्लिकार्जुन सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करून वाचन चळवळ वाढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

शिरूर नगरपरिषद मधील सेवानिवृत्त अधिकारी लिंबराज कोकरे यांचे ते भाचे होत. दरम्यान डॉ. कारंडे यांच्या निधनाबद्दल साहेबराव ढमढेरे कॉलेजचे पदाधिकारी महेश ढमढेरे, मराठी पत्रकार परिषदचे शरद पाबळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद पोपटराव गावडे यांनी शोक व्यक्त करीत आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button