शिरूर येथे दिवंगत जेष्ठ समाज सेवक डॉ.बाबा आढाव यांना श्रद्धांजली
कष्टकऱ्यांचा आधारवड हरपल्याची कार्यकर्त्यांची भावना

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने दिवंगत जेष्ठ समाज सेवक डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .
शिरूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी शिरूर शहरातील रिक्षा संघटना हमाल मापाडी संघटना व कष्टकरी संघटनेच्या वतीने आयोजित या शोक सभेस जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, जिल्हाध्यक्ष संजय बारवकर , लोक जागृती संघटनेचे रविंद्र धनक , व्यापारी संघटनेचे संतोष भंडारी, अजित ओस्तवाल ,परेश सुराणा , कपिल बोरा, प्रितम चंगेडिया , शिरूर ग्रुप विकास सोसायटीचे आप्पा साहेब वर्पे ,शेतकरी संघटनेचे नितीन थोरात,बाजार समितीचे संचालक बंडु जाधव , हमाल मापाडी संघटनेचे शिवाजीराव खेमनर, सकल मराठा समाज शहराध्यक्ष प्रा. सतिष धुमाळ, मनसेचे सुशांत कुटे ,प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, रिक्षा पंचायतचे बाळासाहेब सोमवंशी,नाथाभाऊ पाचर्णे, आपचे अनिल डांगे,सचिव अनिल ढोकले, यासह शहरातील विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, व्यापारी, कामगार, नागरीक उपस्थित होते .
यावेळी जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे, व्यापारी संघटनेचे संतोष भंडारी लोक जागृती संघटनेचे रविंद्र धनक, बाजार समिती संचालक बंडु जाधव, आप्पासाहेब वर्पे, अशोक शेळके, अनिल बांडे, प्रा . सतिष धुमाळ, अशोक कर्डिले यांनी दिवगत सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या निस्वार्थी सामाजिक कार्याची महंती सांगुन श्रद्धांजली वाहिली .
यावेळी कष्टकऱ्यांचा आधारवड हरपल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलताना भावना व्यक्त केली .
यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनी प्रास्ताविक केले . तर आभार सचिव अनिल ढोकले यांनी मानले .



