सामाजिक

शिरूर येथे मालेगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा आणि निघृण हत्येचा तीव्र निषेध

लोक वार्ता न्युज शिरूर :

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा आणि निघृण हत्येचा तीव्र निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी शिरूर तालुका समस्त सुवर्णकार समाज सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे .

यावेळी या निषेध मोर्चात शिरूर तालुका सराफ सोनार संरक्षण समिति चे तालुका अध्यक्ष अशोक शहाणे, प्रमोद सांगवेकर , शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक शरद कालेवार ,माजी नगराध्यक्ष सुवर्णा लोळगे ,अशोक कुलथे सराफ असोसिएशनचे राजेंद्र लोळगे ,शंतनु भैया खांडरे, ॲड .स्वप्निल माळवे,ज्ञानेश्वर शहाणे, कमलेश बोराडे, दिपक घोडके प्रदीप मैड, शरद शहाणे यासह सुवर्णकार समाजाचे बांधव सहभागी झाले होते .

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील चिमुकलीवर एका नराधमाने शारीरिक अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या केली.


या अमानुष आणि पाशवी कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आमच्या समाजात दहशतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका निष्पाप बालिकेसोबत घडलेला हा प्रकार मानवतेला काळिमा फासणारा असून, अशा गुन्हेगारांना समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही.

या घटनेमुळे आमच्या मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कायद्याचा धाक आणि कठोर शिक्षेअभावी अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे फावते आहे, जे समाजासाठी अत्यंत घातक आहे.

या गंभीर घटनेची शासनाने तातडीने दखल घ्यावी आणि खालील मागण्या पूर्ण कराव्यात, अशी आमची आग्रही मागणी आहे: या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात (Fast-Track Court) चालवण्यात यावा. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये.

आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही. पीडित कुटुंबाला योग्य ते संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात यावे. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, याची कृपया नोंद घ्यावी. या प्रकरणात आपण जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button