पुणे जिल्हासामाजिक

शिरूर शहरात पैगंबर जयंती निमित्त जुलूस

लोक वार्ता न्युज शिरूर :

पैगंबर जयंती निमित्ताने लाटेआळी तील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून उत्साहात जुलूस (मिरवणुक) काढण्यात आली. या जुलूस मध्ये सर्वधार्मिय नागरिकांच्या सहभाग होता.

लाटेआळी तील डॉ.आंबेडकर चौकात निशानास(झेंडा ) पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आल्यावर जुलूस निघाला.

माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, विश्वास भोसले, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख, भाजपाच्या रेश्मा शेख, राजू शेख, माजी शहारध्यक्ष केशव लोखंडे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, समस्त सकल मराठा समाज संघ विश्वस्त सागर नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हाफिज बागवान, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मुन्ना आबिद शेख, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल,मनसेच्या डॉ. वैशाली साखरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सानप, नगरपालिकेचे अधिकारी दत्तात्रेय बर्गे, नीलेश विभुते, भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, प्रमोद महाराज जोशी आदी यावेळी उपस्थित होते .

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन फिरोज बागवान यांनी केले.शिरुर शहर सुन्नी मुस्लिम जमआतचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नसीम खान व सिंकदर मण्यार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या वेळी मौलाना सोहेल रझा यांनी धार्मिक प्रार्थना म्हटल्यावर कार्यक्रमास सुरुवात झाली.

या कार्यक्रमात मदिना मशिद व एतहाद ग्रुप बुरुंड आळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शहरातील मारूती आळी,सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, कुंभारआळी, मुंबई बाजार, कापड बाजार, रामआळी या मार्गाने कब्रस्थान मशिद येथे जुलूस गेला.

मिरवणुक मार्गवर ठिकठिकाणी खाऊचे व खाद्य पदार्थ यांचे वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button