शिरूर आगाराला नवीन बसेस मिळण्यासाठी उद्यापासून बेमुदत उपोषण बेमुदत
सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांचे उपोषण

लोक वार्ता न्युज शिरूर :
पुणे जिल्ह्यातील नवीन बस वाटपात शिरूर आगार वंचित राहिलेला असल्याने लवकरात लवकर नवीन बस मिळाव्यात अन्यथा शुक्रवार दि.११ एप्रिल २०२५ रोजी पासुन बसस्थानकात बेमूदत उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी शिरूरचे आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील बस आगारांना सद्या नवीन बस देण्यात येत आहेत परंतु या बस वाटपात पुणे जिल्ह्यातील शिरूर आगाराचा अद्याप नंबर न लागल्याने शिरूर आगार नवीन बस वाटपात वंचित राहिला आहे.शिरूर बस स्थानकाच्या अनेक बस या लांब पल्ल्याच्या आहेत.बस जुन्या झालेल्या असल्याने खिळखिळ्या झालेल्या असून अनेक वेळा नादुरुस्त असल्याने रद्द होणे,प्रवासादरम्यान रस्त्यात मधेच वारंवार बंद पडणे, यांसारख्या समस्या उद्भवत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
बसस्थानकास ऐतिहासिक महत्त्व असुन अद्याप पर्यत शिरूर आगाराला सद्या देण्यात येत असलेल्या नविन बस देण्यात आलेल्या नाहीत.शिरूर आगाराला लवकरात लवकर कमीत कमी वीस बस मिळणे गरजेचे आहे तसेच बस स्थानकातील विविध समस्या सोडवून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.



