शिरूर बस स्थानकातील गैरसोयी विरोधात भाजपा महिला आघाडी करणार आंदोलन

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर बसस्थानकात प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत असून तातडीने या समस्या सोडवाव्यात अन्यथा भाजपा महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार यांनी दिला आहे.
यावेळी भाजप अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहराध्यक्षा कोमल भगवे, उपाध्यक्षा सृष्टी करंजुले,ओबीसी शहराध्यक्षा सुशीला गोसावी,नितु शर्मा,सुषमा फंड,राजेंद्र महाजन, प्रितेश फुलडाळे यांसह उपस्थित होते.
शिरूर बसस्थानक विविध समस्यांचे आगार झाले असल्याने प्रवाशांची, वृध्दांची,महिलांची तसेच शालेय विद्यार्थ्यांना येथील समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यातदेखील बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे . पाणपोई महिला स्वच्छतागृहाशेजारी करण्यात आली आहे परंतु तेथे पाण्याची सोय नाही ,फलाटवर बस वेळेवर न लागणे,वारंवार बस नादुरुस्त असणे,प्रवासात बस मध्येच बंद पडणे,अचानक बस रद्द होणे,बस स्थानक परिसरात व स्वच्छतागृहात अस्वच्छता,स्वच्छतागृहामध्ये महिलांना पैशाची मागणी करणे,बस स्थानकात बस आत येण्या – बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असुन त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले,याच मार्गावर नादुरुस्त बस उभ्या असणे,बसस्थानकात महिलांच्या सुरक्षिततेसाठी होमगार्ड चंदाताई चांगले काम करीत आहे परंतु त्यांच्याबरोबर आणखी दोन पोलीस कॉन्स्टेबल असावे. यांसारख्या विविध समस्यांचे लवकरात लवकर सोडविण्यात येऊन प्रवासांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा भाजपा महिला आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



