राजकीय

शिरूर शहरात महाविकास आघाडीचे रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे चे महाविकास आघाडीचे उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन

लोक वार्ता न्युज शिरूर :

शिरूर शहर महाविकास आघाडीच्या वतीने आज शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिरूर नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ शहरातुन रॅली काढण्यात आली . यावेळी माजी आमदार अशोक पवार, शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार अलका सुरेश खांडरे, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारांसह माजी नगराध्यक्ष गुलाब धाडीवाल, माजी नगरसेवक संतोष भंडारी , अबिद शेख महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली.

यारॅलीदरम्यान शहरातील मतदारांना नगराध्यक्षा पदासाठी अलका सुरेश खांडरे, तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मतदान करून आघाडीला विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले. शिरूर-हवेलीचे माजी आमदार यांनी केलेली विविध विकासकामे आणि नवीन योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली.

शहरातील मुख्य बाजार पेठेसह विविध भागातून काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली. वातावरणात जल्लोष, घोषणाबाजी आणि निवडणूक उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे , माजी आमदार अशोक पवार, माजी नगराध्यक्ष गुलाब धाडीवाल व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका सुरेश खांडरे यांनी रॅली च्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button