पुणे जिल्हासामाजिक

दानशुर उद्योगपती स्वर्गिय रसिकलालजी धारिवाल जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

लोक वार्ता न्युज शिरूर :

दानशूर उद्योगपती स्व. रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या ८६ व्या जयंती निमीत्त शिरूर येथे १ मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्यां रक्तदात्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. यात ८६ सायकली ठेवण्यात आल्या आहेत.
शिबिर उद्योगपती प्रकाश धारिवाल मित्रमंडळ शिरूर शहर व पंचक्रोशी यांच्या वतीने पुणे व नगर येथील रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात १ मार्च रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. शिबिराचे उद्घाटन उद्योगपती प्रकाश धारिवाल, त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या शिबिरात शिरूर शहर पंचक्रोशी, शिरूर तालुका, पारनेर, श्रीगोंदा तालुका येथील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन उद्योगपती प्रकाश धारिवाल मित्रमंडळाने केले आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन नोंदणी व रक्तदानाच्या दिवशीसुद्धा नोंदणी करण्यात येणार आहे. रक्तदात्यांसाठी प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह व लकी ड्रॉ च्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. युवा पिढीला व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व प्रदूषण कमी व्हावे, तसेच सायकलचे महत्त्व पटवून देण्यासाठी सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button