सामाजिक
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यानमाला
शिरूर शहरातील साई गार्डन मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १५ ते १९ फेब्रुवारी २०२५ रोजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी दिली .
या बाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी सांगितले की व्याख्यानमालेचे यंदाचे २८ वे वर्ष आहे .१५ ते १९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही व्याख्याने सायंकाळी दररोज पावणेसात वाजता साई गार्डन मंगल कार्यालय कॉलेज रोड येथे होणार आहेत . व्याख्यानमालेचे पहिले पुष्प १५ फेब्रुवारीस माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी ‘न्यायव्यवस्था सद्यस्थिती आणि आव्हाने ‘ या विषयावर गुंफणार आहेत . १६ फेब्रुवारीला इतिहास संशोधक व ज्येष्ठ पत्रकार अशोककुमात पांडेय हे ‘ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतिचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम ‘ या विषयावर बोलणार आहेत . १७ फेबुवारी रोजी माजी मुख्य सचिव महेश झगडे हे ‘ लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही : संविधानिक जबाबदा-या आणि वास्तव ‘ या विषयावर बोलणार आहेत .१८ फेबुवारीस इतिहास संशोधक व व्यवस्थापन मार्गदर्शक डॉ . अजित आपटे हे ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र ‘ या विषयावर बोलणार आहेत .१९ फेबृवारीस प्रसिध्द लेखक अच्युत गोडबोले हे ‘ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एकूण लेखन ‘ या विषयावर बोलणार आहेत .
शिवजयंतीला बुधवार दिनांक १९ फेब्रुवारीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे . यावेळी पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले ,तहसिलदार बाळासाहेब म्हस्के ,उद्योजक व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल , मुख्याधिकारी प्रितम पाटील , पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ,माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल बाबूराव पाचर्णे आदी उपस्थित राहणार आहेत. मोठ्या संख्येने नागरिकांनी व्याख्यानमालेस उपस्थित रहावे असे आवाहन धनक यांनी केले आहे .
यावेळी ॲड .ओमप्रकाश सतीजा , नीलेश नहार , विजय नहार , माजी नगरसेवक मंगेश खांडरे, प्रा . चंद्रकांत धापटे , रामभाऊ इंगळे आदी उपस्थित होते .



