प्रशासन

शिरूर शहरातील नागरीकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरून कारवाई टाळावी .

शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांचे आवाहन

लोक वार्ता न्युज शिरूर :

शिरूर नगर परिषद हद्दीतील नागरीकांनी चालू वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी नियमा प्रमाणे भरून कारवाई टाळण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे .

मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले की ,पहिल्या सहा माही पूर्वी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणे अनिवार्य आहे अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये थकीत रकमेवर दरमहा २ % शास्ती आकारण्यात येते.

सर्व मिळकत धारकांना आत्ता पर्यन्त भ्रमणध्वनी वर चार वेळेस कर भरणा करणे बाबत संदेश पाठवण्यात आले असून डिसेंबर २०२४ पासून मालमत्ता कराचा भरणा करणे बाबत अन्यथा २ % शास्ती बसविली जाईल या बाबत शहरात नगर परिषद च्या दहा घंटा गाडी द्वारे दवंडी देखील देण्यात येत आहे.

शिरूर नगरपरिषद घोडनदीच्या करसंकलन विभागाने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, कर वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत, थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई ला सुरुवात झाली नगर परिषद भाजी बाजार मधील गाळा मालमत्ता करापोटी सील करण्यात आला आहे.

थकीत मालमत्ता धारकांच्या मालमत्तेची जप्तीची कार्यवाही या पुढे ही अशीच सुरू ठेवली जाणार असल्यामुळे कराचा भरणा करून जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळण्याचे आवाहन शिरूर नगर परिषद मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button