सामाजिक

बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात

लोक वार्ता न्युज शिरुर :

शिरूर रामलिंग रोड येथील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर हे नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. परंपरेनुसार हळदी-कुंकू आणि स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या आनंदाचे उत्सव साजरे केले जातात. याच उत्साहाचे प्रतीक म्हणून संक्रातीनिमित्त यंदाच्या वर्षीही बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूलने महिला पालक यांच्यासाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता.

यामध्ये शिरूर शहरातील व बालाजी इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेतील महिला पालकांनी विशेष सहभाग नोंदवला. हळदी-कुंकू निमित्त महिला वर्गांसाठी विविध गमतीदार खेळांचे जसे की जुने खेळ तळ्यात-मळ्यात, संगीत खुर्ची असे विविध खेळांचे आयोजन केले होते. तसेच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे उखाणा स्पर्धा व रॅम्पवॉक स्पर्धा घेतली गेली. यामध्ये जिंकलेल्या स्पर्धकांना विशेष आकर्षक बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमांत महिलांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला.

शाळेतील शिक्षकांनी महिलांचा तिळगुळ व वाण देऊन सन्मान केला. कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा उज्वलाताई बरमेचा, माजी सरपंच स्वातीताई घावटे उपस्थित होत्या. तसेच बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन सदाशिवआण्णा पवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व महिला पालकांना संक्रांतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली अनंतवार व जया शेळके यांनी केले, तर विविध कार्यक्रमांचे नियोजन संग्राम जंजाळ, सुषमा अजाब, वैष्णवी कांडेकर, ऋतुजा पंधरकर आणि इतर शिक्षकांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक मनमीत चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर वर्ग यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button