क्रीडा

कॅरम क्रिडा स्पर्धेत एस.पी.आय टी. पॉलिटेक्निक, कुरुंद विजयी

लोक वार्ता न्युज शिरूर :

श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नेप्ती, अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या अंतरपदविका विभागीय आयइडीएसएसए क्रीडा स्पर्धेत एस. पी. आय. टी. पॉलिटेक्निक, कुरुंद कॉलेजच्या कॅरम या खेळाच्या संघाने अंतिम सामन्यात संजीवनी पॉलिटेक्निक, कोपरगाव या कॉलेजच्या संघावर मात करीत विजय संपादन केला.

या विजयामुळे कुरुंद कॉलेजचा कॅरमचा विजयी संघ नांदेड येथे होणाऱ्या राज्य पातळीवरील स्पर्धेत खेळणार आहे.

खेळाडूंना संघ व्यवस्थापक प्रा. किशोरकुमार कोकणे, प्रा. नितेश शेळके आणि क्रीडा विभागप्रमुख प्रा. विक्रांत मल्लाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विजयी खेळाडूं *आदित्य मनोज जाधव आणि चैतन्य शहाजी पवार* यांनी अनमोल विजय संपादन केल्याबद्दल संजीवनी प्रतिष्ठान मुंबईच्या खजिनदार व महानगर बँकेच्या अध्यक्ष सुमन शेळके, सचिव सर्फराज पठाण, महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके व स्मिता शेळके, प्राचार्य सुनिलदत्त कापसे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button