शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर २४ नगसेवक पदासाठी ९९उमेदवार रिंगणात

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर एकुण २४ नगरसेवक पदासाठी ९९
उमेदवार रिंगणात असुन या मध्ये विविध राजकीय पक्षासह अपक्षांचा समावेश आहे .
नगराध्यक्ष पदाकरता माजी नगरसेविका मनीषा कालेवार यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला त्यांच्या माघारीमुळे आता ही लढत पंचरंगी लढत होणार आहे चार राजकीय पक्षाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष वैशाली वाखारे या अपक्ष म्हणून मैदानात राहणार आहेत .
परीसा स्वप्निल वेताळ व ज्योती नवनाथ जाधव या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक एक मधून उमेदवारी अर्ज मागे घेतला
प्रभाग क्रमांक दोन मधून गणेश चंद्रकांत कुर्लप,प्रभाग क्रमांक दोन मधून दोन मधून पूजा अमित शिर्के तर प्रभाग क्रमांक दोन मधून माजी नगरसेवक आबीद शेख व सामाजिक कार्यकर्ते फुलडाळे प्रितेश यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले प्रभाग क्रमांक तीन मधून कोणीही अर्ज मागे घेतले नाहीत प्रभाग क्रमांक चार मधून अ मधील उमेदवार ऐश्वर्या साखला व चार ब मधील माजी नगरसेवक उमेश भोसले व आशिष चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी नगराध्यक्ष सुवर्णाला लटांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आज प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आशिष शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अभिजीत पाचारणे या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडून दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज मागे घेतले उमेदवारी जाहीर करू नये या दोन्ही उमेदवाराने घेतलेल्या माघारीमुळे चर्चांना वेग आला असून येथे आता हे दोन्ही पक्ष कोणत्या उमेदवाराला पुरस्कृत करणार याकडे लक्ष लागले आहे .
प्रभाग क्रमांक सहा ब मधून विजय गुजर, जनता दल (धर्मनिरपेक्ष) चे वसंत बेंद्रे,यादव नितीन व सातारकर सागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला प्रभाग क्रमांक सात मधून शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. प्रभाग क्रमांक आठ अ मधून वृषाली नवले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रभाग क्रमांक नऊ मधून जगताप राकेश यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले प्रभाग क्रमांक 9 व मधून माजी नगरसेविका माया गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर प्रभाग क्रमांक दहा अ मधून मधु शिशुपाल व अश्विनी शिशुपाल या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. प्रभाग क्रमांक ११ मधून माजी नगरसेविका कविता वाटमारे व नंदा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले प्रभाग क्रमांक 11 ब मधून तुषार घावटे व शिंदेगट शिवसेनेचे उमेदवार माजी नगरसेवक बाफना सुनील यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे प्रभाग क्रमांक 12 मधून राहुल दसगुडे ,महेंद्र पाचरणे व शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिजीत आंबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून बारा ब मधून बांडे सविता यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे .



