राजकीय

शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रथमच पक्षीय चिन्हावर राजकीय धुराळा उडणार

लोक वार्ता न्युज शिरूर : शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनेक राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडी,भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्षपदासह २४ जागांवर स्वबळावर उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कडवे आवाहन उभे राहणार आहे.अपक्षांनीही नगर पालीका निवडणुसाठी शड्डू ठोकल्याने दि. २१ रोजी अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार असुन शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रथमच पक्षीय चिन्हावर राजकीय धुराळा उडणार आहे.

शिरूर नगरपालीका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह महायुतीतील इतर पक्षांची महायुती उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोमवार दि.१७ रोजी पर्यंत होईल असे शहरात बोलले जात होते.परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडीस सुरूवात झाल्यानंतर अचानक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ),शिवसेना ( शिंदे गट ) आणि महाविकास आघाडी सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.त्याप्रमाणे भाजप,राष्ट्रवादी,शिवसेना ( शिंदे गट ) व महाविकास आघाडी पक्षाने स्वतंत्रपणे स्वबळावर नगराध्यक्षपदासह बारा प्रभागात २४ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले असून महाविकास आघाडी,शिवसेना,मनसे प्रणीत जनहित आघाडी व शिरूर परिवर्तन आघाडीने स्वतंत्र पॅनल निवडणूक रिंगणात उभे करुन नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर तर इतर पक्षांनी काही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शिरुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदा चार पक्ष चिन्हा लढत आहेत.मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार माऊलीआबा कटके आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार पक्ष ) माजी आमदार अशोक पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

यावेळी शेवटी भाजपच्यावतीने नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवारी भरण्याच्या सुचना भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे व जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार कटके यांनी केल्यानंतर अचानक झालेल्या या निर्णयाने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती.यावेळी शेवटी भाजपच्यावतीने नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवारी भरण्याच्या सुचना भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे व जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार कटके यांनी केल्यानंतर अचानक झालेल्या या निर्णयाने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती.महाविकास आघाडी एकसंध असुन भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना हे स्वबळावर लढत असल्याने कडवे आवाहन उभे राहणार आहे.

शिरूर नगरपालीका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह महायुतीतील इतर पक्षांची महायुती उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सोमवार दि.१७ रोजी पर्यंत होईल असे शहरात बोलले जात होते.परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडीस सुरूवात झाल्यानंतर अचानक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ),शिवसेना ( शिंदे गट ) आणि महाविकास आघाडी सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले होते.त्याप्रमाणे भाजप,राष्ट्रवादी,शिवसेना ( शिंदे गट ) व महाविकास आघाडी पक्षाने स्वतंत्रपणे स्वबळावर नगराध्यक्षपदासह बारा प्रभागात २४ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले असून महाविकास आघाडी,शिवसेना,मनसे प्रणीत जनहित आघाडी व शिरूर परिवर्तन आघाडीने स्वतंत्र पॅनल निवडणूक रिंगणात उभे करुन नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर तर इतर पक्षांनी काही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्यावतीने माजी उपनगराध्यक्षा अलका सुरेश खांडरे ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ), भाजपकडून माजी नगराध्यक्षा सुवर्णा राजेंद्र लोळगे, राष्ट्रवादी काँग्रेसकडुन ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे,शिवसेनेकडुन माजी नगरसेविका रोहिणी किरण बनकर तर माजी नगराध्यक्षा वैशाली दादाभाऊ वाखारे व माजी नगरसेविका मनीषा कालेवार यांनी अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.नगराध्यक्षपदासाठी ९ तर सदस्यपदासाठी १९३ असे नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.मंगळवार दि.२८ रोजी झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदाचे तीन तर नगरसेवकपदाचे पाच असे आठ अर्ज अवैध झाल्याने १९४ अर्ज वैध झाले

सोमवार दि.१७ रोजी सकाळपासुनच जागा वाटपावरून राजकीय  घडामोडीनीं वातावरण पुरते ढवळून निघाले होते.त्यानंतर दुपारी माजी आमदार अशोक पवार ( महाविकास आघाडी ) व आमदार माऊलीआबा कटके ( राष्ट्रवादी काँग्रेस ) यांच्या संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी एकच तोबा गर्दी केले होती.यावेळी शेवटी भाजपच्यावतीने नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवारी भरण्याच्या सुचना भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे व जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार कटके यांनी केल्यानंतर अचानक झालेल्या या निर्णयाने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button