मातोश्री प्रतिष्ठानच्या वतिने महिलांचा विशेष सन्मान
जागतीक महिला दिना निमित्त मातोश्री प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम

लोकवार्ता न्युज शिरुर :
सामाजीक जडघडणीत महिलांचा वाटा मोठा असुन प्रत्येक क्षेत्रात महिलांची आघाडी असुन जर कुटुबांनी प्रोत्साहन दिल्यास प्रत्येक क्षेत्रात यशस्वी कार्याचा ठसा त्या उमटु शकतात असे मत मातोश्री कला क्रिडाप्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर यांनी व्यक्त केले .
जागतीक महिला दिना निमित्त मातोश्री प्रतिष्ठानच्या वतिने शिरुर शहरातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते सन्मानचिन्ह व शाल असे सन्मान करण्यात आले या वेळी आदिती आंबेकर ,प्रा सतिष धुमाळ ,शैलेश जाधव ,सतिष केदारी या वेळी उपस्थित होते .
प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच महिलांचा सन्मान त्यांच्या घरी जाउन करण्यात आला अलका बेलोटे (राजमाता ॲकॅडमी ),डॉ स्मिता बोरा (आयुर्वेदाचार्य ),कामिनी बाफणा (ॲक्टीव्हगृप),स्नेहल झांबरे (उद्योजिका ),वर्षा काळे (यशस्वी उद्योजिका ) या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मातोश्री प्रतिष्ठान गेल्या पंचवीस वर्षापासुन विविध उपक्रम राबवित आहे .



