मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी
आरोपींच्या फोटोना जोडे मारत आंदोलन

लोक वार्ता न्युज शिरुर :
शिरुर येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी करीत त्यांच्या मारेकरांच्या फोटोस जोडे मारण्यात आले .
छत्रपती शिवाजी महाराज की जय , छत्रपती संभाजी महाराज की जय च्या घोषणा बरोबर , सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहीजे अश्या ही घोषणा देण्यात आल्या .
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अंत्यत निर्घूणपणे व अमानुषपणे करण्यात आली असून याप्रकरणातील संबधित सर्वांवर जलद व कुठल्याही दबावाला बळी न पडता कारवाईची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी खून प्रकरणातील आरोपींच्या फोटोना जोडे मारत आंदोलन करण्यात आले .
शहरातील हॉटेल आस्वाद जवळ करण्यात आलेल्या या आंदोलनास आखिल भारतीय मराठा महासंघाचे श्यामकांत वर्पे , महिला आघाडी तालुकाध्यक्ष अर्चना डफळ , संघटक आशा ढवण , माजी अध्यक्षा शशिकला काळे , जनता दलाचे संजय बारवकर , समस्त मराठा समाज संघचे विश्वस्त व माजी उपसरपंच संभाजीराव कर्डिले, रामभाउ इंगळे , संजय माशेरे , महेंद्र ढेरे , अखिल भारतीय मराठा महासंघ युवा आघाडीचे राहुल शिंदे , शिरुर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आप्पा वर्पे , मुकेश पाचर्णे , भरत ढाके ,आदी यावेळी उपस्थित होते.



