स्व. उदयदादा शेळके ऊर्जा आणि प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व – गीतांजलीताई शेळके

लोक वार्ता न्युज शिरूर – संजीवनी प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा बँक व जी एस महानगर बँकेचे माजी अध्यक्ष स्व. उदयदादा शेळके यांचे द्वितीय पुण्यतिथी निमित्त संजीवनी प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल कुरुंद येथील एस.पी.आय.टी. पॉलिटेक्निक येथे रक्तदान शिबीर व वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. दादांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करून झाली. प्रा. संदिप जाधव यांनी प्रस्तावनेतून कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. दादा नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करायचे. त्यामुळे या प्रसंगी पॉलिटेक्निक, बीएड व डीएड कॉलेजमधील परीक्षा व खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवर यांचे हस्ते करण्यात आला.
तसेच प्रा. विजय जाधव आणि प्रा. रविंद्र मंडलिक यांचा पीएच डी प्राप्त केलेबद्दल विशेष सन्मान गीतांजलीताई शेळके यांचे हस्ते करण्यात आला. जनकल्याण रक्तकेंद्राचे
जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे यांनी रक्तदानाचे महत्व विद्यार्थी व उपस्थितांना सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब खोडदे यांनी स्व. सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांचे कार्यास उजाळा देऊन स्व. दादांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावून नावलौकिक मिळविल्याचे प्रतिपादन केले.

स्व. अँड उदयदादा शेळके एक अनोखी ऊर्जा आणि प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व असल्याचे यावेळी जी एस महानगर व अहमदनगर जिल्हा बँक संचालिका आणि उदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा गीतांजलीताई शेळके यांनी प्रकर्षाने सांगितले.
यावेळी जनकल्याण रक्तकेंद्र, अहिल्यानगर यांचे रक्तदान शिबिरात 51 जणांनी रक्तदान केले. डॉ. ओजस् मुनोत व त्यांचे सहकारी यांनी रक्तदान शिबिरात मोलाची कामगिरी बजावली. कार्यक्रमास निळूभाऊ सोनवणे, जी एस महानगर बँकेचे संचालक शिवाजी कारखिले, अहमदनगर जिल्हा बँक तालुका विकास अधिकारी प्रभाकर लाळगे आणि त्यांचे सहकारी रंगनाथ गायकवाड, लोंढे, पठारे, रेपाळे, दरेकर, पिंपरी जलसेन गावचे विठ्ठल अडसरे, रामदास शेळके, प्राचार्य सुनिलदत्त कापसे, प्राचार्य अर्जुन शेटे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. संदीप जाधव यांनी केले.



