ॲड .विलास जाधव यांची शिरूर तालुका नोटरी असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशनच्या मुंबई येथील कार्यक्रमात निवड

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर येथील जेष्ठ विधीतज्ञ व प्रसिद्ध नोटरी ॲड . विलास पिराजी जाधव यांची शिरूर तालुका नोटरी असोसिएशन च्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशनच्या वतीने ॲड . विलास पिराजी जाधव यांची मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली.
यावेळी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष ॲड . यशवंत खराडे, सचिव ॲड . प्रवीण नलावडे, पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड . कल्याण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जाधव यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शिरूर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर उद्योजक फक्कडराव काळे, शितोळे करियर ॲकडमीचे संजय शितोळे , राजेश कदम यासह शिरूर बार असोसिएशन चे सदस्य यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ॲड.जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.


