सिताबाई थिटे डी. फार्मसी महाविद्यालयास उत्कृष्ट दर्जा प्राप्त

लोक वार्ता न्युज शिरूर :
श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी, शिरूर या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई द्वारे करण्यात आलेल्या बाह्य संस्था सर्वेक्षण मध्ये उत्कृष्ट दर्जा प्रदान करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी दिली.
मंडळामार्फत नेमणूक केलेल्या देखरेख समितीच्या पथकाद्वारे सदर सर्वेक्षण करण्यात येते. देखरेख समितीच्या पथकाने महाविद्यालयास भेट दिली. त्या वेळी शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज, आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, सर्व पायाभूत सुविधा, संगणक कक्ष, महाविद्यालयाचा निकाल, अनुभवी शिक्षक वृंद , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी घेतलेले उपक्रम, मुलींच्या वसतिगृहातील दर्जेदार सोयी सुविधा आणि निकालातील सातत्यपूर्ण प्रगती या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. या सर्व क्षेत्रात महाविद्यालयाने साधलेली भरीव प्रगती व गुणवत्ता पाहून सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी . फार्मसी या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ साठी उत्कृष्ट दर्जा प्रदान केला आहे.
महाविद्यालयात रुग्ण समुपदेशन, पालक सभा, औद्योगिक भेट, शैक्षणिक सहली, ग्रीन कॅम्पस आणि नोकरी साठीचे नामांकित कंपन्यांचे मेळावे अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे, संशोधन व नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविणे हेच आमचे भावी ध्येय आहे असे कॉलेजचे प्राचार्य डॉ.अमोल शहा यांनी नमूद केले.
या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे, संचालक डॉ हर्षवर्धन थिटे, सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी तसेच पालक वर्ग यांचे मोठे योगदान असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शहा यांनी सांगितले.



