सामाजिक

शिरूर येथे  महाआरोग्य शिबीर

प्रवीण शिशुपाल सोशल फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

लोक वार्ता न्युज शिरुर  : 

शिरूर येथे  महाआरोग्य शिबीराचे प्रवीण शिशुपाल सोशल फाऊंडेशनचे वतीने १५ फेब्रुवारी २०२५ आयोजन करण्यात आले आहे .

शिरुर नगरपरिषद मंगलकार्यालय येथे प्रवीण शिशुपाल सोशल फाऊंडेशनचे वतीने शनिवार दिनांक १५ रोजी होणाऱ्या या मोफत सर्व रोग निदान व आरोग्य शिबीरात , डोळे तपासणी ,मोतीबिंदू उपचार शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज सय्यद यांनी दिली .

यावेळी मंत्रालयातील विशेष कार्यकारी आधिकारी प्रवीण शिशुपाल , विलास शिशुपाल , नगरसेवक विनोद भालेराव, ॲड . स्वप्नील माळवे,
रुस्तूम सय्यद आदीसह फाउंडेशनचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
सय्यद यांनी सांगितले की हे महाआरोग्य शिबीर प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडैशनचा वतीने व रुबी हॉल रक्तपेढी , डॉ . मनोहर डोळे फाउंडैशन नारायणगाव यांच्या सयुंक्त विद्यमाने रंजना शिशुपाल व अलका साबळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त होत असून शिबीराचे उदघाटन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट करणार आहेत .
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर ,आमदार अमोल मिटकरी , उद्योगपती प्रकाश धारीवाल , आमदार ज्ञानेश्वर कटके ,माजी आमदार अशोक पवार , पोपटराव गावडे , व राहूल बाबूराव पाचर्णे आदी उपस्थित राहणार आहेत .
शिबीरात रुग्णांना औषधे व गोळ्या तसेच चष्मे मोफत देण्यात येणार असुन रक्तदात्यास प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे .
डॉ . प्रवीण गायकवाड ,त्वचा रोगतज्ञ डॉ . आनंद क्षीरसागर , डॉ . अनिल सोळुंके , डॉ . रमिक कमते , डॉ अमेय सांगळे , डॉ . सतीश आंधळे , डॉ अर्चना आंधळे ,  डॉ . राहुलदत्त पाटील . डॉ . रश्मी पाटील ,डॉ विश्वदीप कारखिले , डॉ . शितल कारखिले , डॉ . हरिश्चंद्र प्रसाद , डॉ . श्रीकांत वेताळ , डॉ . विशाल पानशेवडीकर , डॉ . प्रवीण महाजन , डॉ . रोशनकुमार पाटील ,डॉ . दादाभाऊ बरकले , आदी शिबीरात असणार असल्याचे आयोजकांनी सांगितले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button