स्व.बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणारा संस्था व व्यक्तीना पुरस्कार

लोक वार्ता न्युज शिरूर :
स्व.बाबूराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने विविध क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम करणारा संस्था व व्यक्तीना पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे .
रविवार दि.३ ऑगष्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता समितीच्या सभागृहात रांजणगाव गणपती ता. शिरुर जि.पुणे येथे शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे नियामक मंडळ चे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड . एस. के. जैन यांचे हस्ते प्रांत संघटन मंत्री भारतीय किसान संघ प्रांत संघटक चंदन पाटील यांचे अध्यक्षतेखाली तर आमदार माउली आबा कटके व पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक प्रदीप कंद यांचे उपस्थितीत राहणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष ॲड . धर्मेद्र खांडरे व उपाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी दिली .
यावेळी तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शिरुर तालुक्याच्या भल्याकरीता काम करणा-या पुरस्कार्थांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. श्री धर्मेद्र खांडरे यांनी केले आहे .यावेळी समितीचे कोषाध्यक्ष सागरनाना फराटे , सुरज दामोदर उपस्थित होते .
याबाबत माहिती देताना स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी सांगितले की विविध क्षेत्रात निरपेक्षपणे काम करुन समाजाची सेवा करीत आहे त्याची दखल घेवून व त्याच्यापासून प्रेरणा इतर घटकांनी देखील काम करावे या उद्देशाने बाबूराव दौंडकर स्मारक समितीचा वतीने कृषी , पर्यावरण , जल व्यवस्थापन , सेवा , गोसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारा व्यक्ती व संस्था यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वर्गिय कांचनभाई शहा जल व्यवस्थापन पुरस्कार पाणीदार टीम , कान्हूर मेसाई , स्वर्गिय बिंदूमाधव जोशी पर्यावरण पुरस्कार -ग्रामविकास फाउंडैशन कोंढापूरी , यांना स्व . मधुकरआण्णा टेमगिरे कृषी गौरव पुरस्कार नांगरगावचे कांतीलाल नलगे , व स्वर्गिय बबुताई बाबूराव दौंडकर कृषी गौरव पुरस्कार बुरुंजवाडीच्या सौ . नूतन प्रवीण नळकांडे , स्वर्गिय गणपत मुकिंदा खेडकर सेवाकार्य पुरस्कार महावीर कि रोटी यांना तर स्वर्गिय संतोष बापू गांधी गोसेवा पुरस्कार दहिवडीचे सुरेंद्र महाराज देव यांना जाहीर करण्यात आला आहे .पुरस्कार्थीना पाच हजार रुपये व मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे .



