सामाजिक

दानशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल धारिवाल यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर संपन्न

१२४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर चे  दानशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरात १२४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे .

उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळ शिरूर व पंचक्रोशी व पुणे येथील केइम ब्लड बँक, शिरूर येथील ओम ब्लड बँक, अहिल्यानगर येथील आनंद ऋषी ब्लड बँक, अहिल्यानगर अर्पण ब्लड बँक, भोसरी पुणे येथील संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे महारक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
दानशूर उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जयंती निमीत्त आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे माजी आमदार अशोक पवार व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, युवा उद्योजक आदित्य धारिवाल, नाते रक्ताचे राम बांगर, माजी नगरसेवक बाबू वागस्कर यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व स्वर्गीय रसिकलाल धारीवाल यांच्या प्रतिमेत पुष्पहार घालून अभिवादन करून करण्यात आले.

यावेळी मनसेचे नेते बाबू वागस्कर, राम बांगर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, माजी नगरसेवक विजय दुगड, माजी नगराध्यक्ष जाकिरखान पठाण, गोडाजी पार्श्वनाथ ट्रस्ट विश्वस्त सतिश धाडीवाल,रमेश कर्नावट, घोडगंगा च माजी संचालक पांडुरंग थोरात, जुन्नर चे तहसीलदार सुनील शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे,रक्तदान शिबिराचे आयोजक प्रशांत शिंदे,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,शरद कालेवार , संतोष शितोळे , किरण बनकर, तुकाराम खोले, संघपती भरत चोरडिया, योगेश जामदार,संजय देशमुख,विनोद भालेराव, ,सागर नरवडे,निलेश जाधव, सुशांत कुटे, संजय देशमुख, अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, राजेंद्र गावडे, आशिष नहार,एजाज बागवान,मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, उद्योजक धरमचंद फुलफगर, शिवसेवा मंडळाचे सचिव मनसुख गुगळे,माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, आदर्श सरपंच अरुणराव घावटे, श्रीनिवास परदेशी, प्रभाकर ढेरे ,आर एम डी धारीवाल स्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु, रंजन झांबरे,सरपंच विठ्ठल घावटे,अविनाश जाधव, सुनिल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र काळे, राजेंद्र नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते स्वप्निल गायकवाड, महेश ढमढेरे आजी-माजी नगरसेवक प्रकाशभाऊ धारिवाल मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button