सोशल मिडीया वर वृत प्रसारीत करताना सत्यता पडताळणी गरजेचे : किशोरराजे निंबाळकर
उद्योगपती आदित्य प्रकाश धारिवाल यांना युवाउद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

लोक वार्ता न्युज शिरूर :
सोशल मिडियावर वृत प्रसिद्ध करताना पत्रकारांनी सत्यता पडताळणी करणे गरजेचे असल्याचे परखड मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले .
शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पत्रकार संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान शिरूर येथे करण्यात आला.
यावेळी प्रसिद्ध दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर,शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊलीआबा कटके यांच्या पत्नी मनीषाताई कटके,माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन दिदी, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील,नगरसेवक विनोद भालेराव,विठ्ठल पवार,निलेश जाधव, सुनील जाधव,स्वप्नील रेड्डी,शोभना पाचंगे,शशिकला काळे,राणीताई कर्डिले,सुजाता बोरुडे ,सुजाता पाटील, सृष्टी करंजुले, डॉ. वैशाली साखरे अदि मान्यवरासह पत्रकार संघाचे सं.अध्यक्ष संतोष शिंदे, तालुकाध्यक्ष अर्जुन बढे,शहराध्यक्ष बबन वाघमारे, तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब खपके,योगेश भाकरे, संपर्क प्रमुख आकाश भोरडे,सचिन जाधव,किरण चौधरी,महिला शहराध्यक्ष अश्विनी सांगळे,उपाध्यक्ष रुपाली खिलारी,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी सोशल मिडीया मुळे बदलेली पत्रकारिता यावर सुचक विचार मांडुन पत्रकार संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक उपक्रम प्रेरणादायी असल्याचे विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमात माणिकचंद उद्योग समुहाचे उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
या कार्यक्रमात दानशूर युवा उद्योगरत्न – आदित्य प्रकाशभाऊ धारिवाल,माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.ल्युसी कुरियन दिदी – समाजरत्न,कार्यक्षम अधिकारी – अनिल कटके ( DYSP ), स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात चौथा क्रमांक मिळाल्याबद्दल – शिरूर नगरपरिषद,आध्यात्मिक समाजप्रबोधनकार – ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज रासकर, आदर्श पंचायत समिती सदस्य : आबासाहेब सरोदे,उत्कृष्ठ नायब तहसीलदार ( महसूल ),कार्यक्षम पोलीस : जनार्दन शेळके ( LCB ), आदर्श पत्रकार – धर्मा मैड,आदर्श पत्रकार – सतिश धुमाळ,उद्योजक – राजेंद्र शिंदे,उत्कृष्ट निवेदक – रावसाहेब चक्रे,सामाजिक क्षेत्रातील – योगेश जामदार, वयाच्या ६३ व्या वर्षी L.L.B.केल्याबद्दल – बाबुराव पाचंगे,कार्यक्षम महिला होमगार्ड – चंदाताई चव्हाण,Ph.D.in Botany केल्याबद्दल – हर्षद शिर्के,कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन – पै.संस्कार येलभर, डॉक्टर रत्न : डॉ.प्रसन्ना बिहाणी ( बालरोग तज्ज्ञ ), आदर्श मुख्याध्यापक : संतोष चव्हाण,वृक्ष मित्र : तुषार वेताळ, युवा कवीरत्न : आकाश भोरडे आदिंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक,उद्योग,शैक्षणिक,डॉक्टर,क्रिडा,महसुल,पोलीस,वनीकरण,आध्यात्मिक,पत्रकार,होमगार्ड यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करून पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत संतोष शिंदे,प्रास्ताविक अर्जुन बढे,सुत्रसंचलन रावसाहेब चक्रे,आभार भाऊसाहेब खपके यांनी मानले.



