प्रशासन

शिरूर आगाराला नवीन बसेस मिळाव्यात

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व भाजपचे वतीने आंदोलनाचा इशारा

लोक वार्ता न्युज शिरूर :

पुणे जिल्ह्यातील आगारांसाठी नवीन कोऱ्या एसटी बसचे वाटप करण्यात येत आहे.परंतु जिल्ह्याच्या वाटपात शिरूर आगाराला नंबर अद्याप लागला नसल्याने शिरूर आगार नवीन बसपासून वंचित राहिला असून लवकरात लवकर शिरूर आगाराला नवीन बस मिळाव्यात अन्यथा बस स्थानकासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व भाजपचे राजेंद्र महाजन यांनी शिरुरचे आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

यावेळी शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अर्जुन बढे,संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे,शहराध्यक्ष बबन वाघमारे,तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब खपके,सचिन जाधव शिरूर शहर भाजपचे चिटणीस राजेंद्र महाजन,आकाश चाकणे आदी उपस्थित होते.

शिरुर आगारातून अनेक बस या लांब पल्ल्याच्या सुटत आहे.बस जुन्या झालेल्या असल्याने खिळखिळ्या झालेल्या असून अनेक वेळा वारंवार नादुरुस्त असणे,रस्त्यात मधेच बंद पडणे यांसारख्या समस्या उद्भवत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.शिरूर बस स्थानकास ऐतिहासिक महत्त्व असुन अद्याप पर्यंत शिरूर आगाराला सद्या देण्यात येत असलेल्या नविन बस देण्यात आलेल्या नाहीत.

तरी शिरूर आगाराला कमीत कमी वीस बस मिळणे गरजेचे असून बस स्थानकातील विविध समस्या सोडवून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगाराच्यावतीने प्रस्ताव पाठवून नविन बस मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

 

विविध संघटना प्रवाशांच्या निवेदन व मागणीनुसार राज्य परिवहन शिरूर आगारास बस मिळण्याबाबत वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे

मनिषा गायकवाड व्यवस्थापक शिरूर आगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button