शिरुर तालुका खरेदी विक्री संघावर महायुतीचे वर्चस्व
सभापतीपदी राजेंद्र नरवडे यांची तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे

लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरुर तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र उत्तम नरवडे यांची तर उपसभापतीपदी बाळासाहेब अर्जूनराव नागवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे .
शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे नव निर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या बिनविरोध निवडी नंतर झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार पोपटराव गावडे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा महाडीक ,कात्रज जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे ,जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड , बाजार समितीचे माजी सदस्य आबाराजे मांढरे , पक्ष निरीक्षक अण्णा महाडिक , आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , शिरुर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , राजेंद्र गावडे , पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे , माजी सभापती शरद कालेवार ,माजी सरपंच प्रकाश थोरात , श्रीनिवास घाडगे ,तज्ञिका कर्डिले , श्रृतिका झांबरे आदी सह नवनिर्वाचीत संचालक उपस्थित होते .
शिरूर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व माननारे नेते व कार्यकर्ते असुन हे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार माऊली आबा कटके यांच्या निकालाने दिसून आले आहे . विधानसभा निवडणुकीपुर्वी व नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे तालुक्यातील अनेक दिग्गज नेते,पदाधिकारी कार्यकर्ते यांचा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट ) मध्ये प्रवेश झाला असल्याने तालुक्यात महायुतीची पकड़ मजबुत झाली आहे . त्यामुळे महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिरूर तालुका खरेदी विक्री संघावर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या या निवडणूकीत १७ जागा पैकी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या १०जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या . तर २ संचालक माजी आमदार अशोक पवार यांचे निवडून आले होते . त्यानंतर ५ जागासाठी निवडणूक झाली . त्यात ५ ही जण माजी आमदार अशोक पवार यांचे निवडून आले होते . यामुळे खरेदी विक्री संघाचा निवडणूक चुरशीची होईल असे बोलले जात होते. प्रत्यक्षात सभापती पदाच्या निवडीकरीता राजेंद्र नरवडे व उपसभापतीपदी करीता बाळासाहेब नागवडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्याची निवड बिनविरोध झाली आहे.
नवनिर्वाचीत सभापती राजेंद्र नरवडे निवडी नंतर बोलताना म्हणाले की, पक्षाने सभापती पदाची संधी दिली त्या संधीचे सोने करु व पक्षाशी प्रामाणिक राहुन जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालकांच्या सहकार्याने जिल्हयात आदर्श म्हणून शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचा नाव लौकीक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी नवनिर्वाचित सभापती राजेंद्र नरवडे व उपसभापती बाळासाहेब नागवडे यांचे उपस्थित मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले .



