शिरूर नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांची पसंती महाविकास आघाडीला :खासदार अमोल कोल्हे
लोक वार्ता न्युज शिरूर :
शिरूर नगरपरिषदेत सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांची पसंती महाविकास आघाडीला असून महाविकास आघाडीतील सर्वपक्ष या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले .

शिरूर नगपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी रिंगणात उतरली असुन कार्यालयात खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शिरूरमहाविकास आघाडी रिंगणात उतरली असुन कार्यालयात खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व बारा प्रभागातील एकुण २४ जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे .
महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी आपल्या पक्ष कार्यालयात केलेल्या या मुलाखती दरम्यान जिल्हा राष्ट्रवादीचे देवदत्त निकम, घोडगंगा चे विश्वासकाका ढमढेरे,माजी संचालक पांडुरंग आण्णा थोरात ,शिवसेना तालुका प्रमुख पोपट शेलार, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, संजय देशमुख, मंगेश खांडरे, मुन्ना शेख ,माजी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव यादव, ॲड, किरण आंबेकर , ॲड . प्रदिप बारवकर, संजय देशमुख अजिम सय्यद, राष्ट्रवादीचे मुजफ्फर कुरेशी , राहील शेख , हापिज बागवान , यासह इच्छुक उमेदवार महिला,पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते .



